नैतिकतेचा अवयव
इतरांची वागणूक समजावी आणि तिचे मूल्यमापन करता यावे यासाठी आपल्या मेंदूंमध्ये बरीच तरल यंत्रे उत्क्रांत झाली आहेत. इतरांसोबत राहण्यासाठी हे आवश्यकच होते. आपल्या एकूण मनोधारणांच्या घडणीमागे जगण्याची आणि वंशजांच्या रूपात तगण्याची जुनीच गरज होती, हेही आपण वारंवार पाहिले. पण आपल्यांत, माणसांत, अन्न, निवारा, कामव्यवहार या साध्या गरजांच्या पलिकडे जाण्याची क्षमताही असते. आजचे आपले इतर प्राण्यांबद्दलचे …